Tuesday, 2 September 2014

माला कधी असे वाटते ,तर कधी तसे वाटते ,
वाटते घ्यावा उंच झोका ,
पन पडून न जावे हा  ही धोका ,
कधी वाटते घ्या भरारी ,जग जिंकण्याची ,
परी भीती माशी  कुठे शिंकण्याची,
माझ्या जगात कुणी शिरनार तर नाही ?
मला कुरवाड़ित कुणी हरनार तर नाही ?
                  मरण्याची भीती काही केल्या जात नाही,
                  परभवाचे शल्य ही सोसत नाही ,
                  काय करू ख़रच कड़त नाही ,
                 सीता व्हावे,की निर्भया व्हावे ,
                 कड़ायला जागा नाही .
झालीच सीता तर जामिनीतच गड़ावे लागणार ,
आणि निर्भया   झाली तर .............?
नको ग आई मला हे सारे काही ,
कारण त्यासाठी आधी मला हे जग बदलावे लागणार ,
झालेच तर मला शिवाजी ची आई व्हावे लागणार ,
नाही तर सावित्री व्हावे लागणार.